पण मी काहीच करु शकत नाहीये!

माझं घर उध्वस्त होतयं,
माझी माणसं मारली जातायत
पण मी काहीच करु शकत नाहीये!

टीव्हीवाले सगळ्याचाच बाजार मांडतायत,
लोक आतंकवाद्यांना बघायला जातायत
पण मी काहीच करु शकत नाहीये!

नेते इथे फक्त मिरवायला येतायत,
अजूनही मतांच्या पेट्याच भरल्या जातायत
पण मी काहीच करु शकत नाहीये!

मुलं दहशतीचे खेळ खेळतायत,
त्यांच बालपण मात्र विसरतायत
पण मी काहीच करु शकत नाहीये!

लोक सगळं किती पटकन विसरतायत,
आतंकवाद्यांना मारल्यावर जल्लोष करतायत
पण मी काहीच करु शकत नाहीये!

डोळ्यांत अश्रु उभे राहतयत,
मनात राग कोंडला जातोय
पण मी काहीच करु शकत नाहीये!

मनात कुठेतरी नवी उमेद जन्माला येतेय
हे सगळं बदलायचं अशी जिद्द निर्माण होतेय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *